हॅलो उमरगा | प्रतिनिधी
जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आज उमरगा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे चौक, उमरगा येथे चक्काजाम आंदोलन उत्साहात पार पडले.
आंदोलनात शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- स्मार्ट मीटर योजना तात्काळ बंद करावी.
- राज्यातील लोडशेडिंग कायमस्वरूपी थांबवावे.
- सोनम वांगचुक प्रकरणात न्याय मिळावा.
- NEET-TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी.
यावेळी आमदार प्रविण स्वामी यांनी शासनाने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरगा-लोहारा यांच्या वतीने आयोजित या आंदोलनाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.










