उमरगा शहरातील कार्ले प्लॉट–डिग्गी रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या जागेचे भूमिपूजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी ११ वाजता भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाले.
कार्ले प्लॉट परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते. या उपक्रमाला नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य करत वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत जागा उपलब्ध करून दिली. संबंधित जागा **’श्री तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट’**च्या नावाने खरेदी करण्यात आली असून, त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, नगरसेवक शफी चौधरी, राहुल शिंदे, शरद पवार, सिद्धार्थ सोनकांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख योगेश तपसाळे तसेच युवा नेते रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास परिसरातील वाल्मिक बोयणे, वसंत वासुदेव, अहमद मुजावर, विलास दुधभाते, वलीसाहेब तांबोळी, कैलास स्वामी, प्रा. हुळमुजगे, अशोक खवडे, विश्वनाथ आलगुडे, शिवाजी माने, गोविंद सुर्यवंशी, लक्ष्मण पवार, गौरीशंकर तेली, संदीप जगदाळे, देवीच्या पुजारी सौ. सरस्वती पांचाळ यांच्यासह ओंकार साखरे, दत्ता जाधव, विनोद सगर, संदीप जाधव, ज्ञानेश्वर हिंडोळे, माजीद मुजावर, नितीन वासुदेव, अनिल पांचाळ, सिद्धेश्वर हिंडोळे, हाणमंत पांचाळ, दिनेश बिराजदार, पंडित पांचाळ, सुरज मोरे, शैलेश जगताप, नागेश हिंडोळे तसेच महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी मंदिरासाठी जागा उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचे आभार मानले. या ठिकाणी भविष्यात भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून, परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










