जिवंत यातना | कवी : युवराज शिवाजी गायकवाड (डिग्गीकर)

helloomerga

कशी मांडू  व्यथा

कशी सांगू  कथा

कसं  रे जीवना

कसं जगू  सांग ना….

चार चाकी गाडा

हाच आमचा लढा

काय  आमचा गुन्हा

इकरडं जरा बघा  ना…

कसली ही धरपड 

कसली हो पडझड 

कुणा सांगू वेदना 

इकरडं जरा बघा  ना…

बाबा हेच का जिवन

आयुष्यभर झगडणं 

चालण आता जमेना. 

फोड आलेत पायांना….

बास्स झाल बाबा 

कसरतीचा खेळ

नाही कुणा वेळ 

नाही कुणा मेळ….

बाबा थोडं थांब ना 

नको या जिवंत यातना……

कवी : युवराज शिवाजी गायकवाड (डिग्गीकर)

Join WhatsApp

Join Now