नारंगवाडी मंडळात पशुसंवर्धन योजनांबाबत शेतकरी मेळावा संपन्न

नारंगवाडी मंडळातील युवक व महिलांना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत ५० टक्के, ७५ टक्के व १०० टक्के अनुदानावर उपलब्ध असलेल्या गाय, म्हैस पालन, कुक्कुटपालन व शेळीपालन योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रगती पाटील यांनी शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच पशुपालनातून उत्पन्न वाढीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी युवक व महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह राम पाटील, शरद पवार, शुभम पवार, पृथ्वीराज पवार, कृषी सहाय्यक सचिन पवार, इंगळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व युवक उपस्थित राहून त्यांनी योजनांविषयी माहिती जाणून घेतली.

या शेतकरी मेळाव्यामुळे परिसरातील शेतकरी, महिला व युवकांमध्ये पशुपालन व्यवसायाबाबत जागृती निर्माण झाली असून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत उत्साह दिसून आला.

Join WhatsApp

Join Now