जिजाऊ चौक,शिवपुरी कॉलनी पेन रोड परिसर आणि समाज विकास संस्थेचे मधुकर धस प्रशिक्षण केंद्र तुरोरी अशा विविध ठिकाणी संकरित बोरी, आंबे, जांभूळ आणि सावली आणि ऑक्सिजन देणारी झाडे लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला उपक्रमात घेतला, झाडे लावून त्यांचं संगोपन करण्याचं कार्य येथील स्वयंसेवक करत आहेत. भूमिपुत्र वाघ यांचे धर्मगुरू विश्वनाथ अण्णा तोडकर यांची 61 ची वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.त्यासोबत सखी महिला मंडळाच्या वतीने आणि मॉर्निंग वॉकचे कार्यकर्ते पदाधिकारी यांणी वृक्ष लागून संवर्धनाचा संदेश घोषणा देत जनजागृती करत करत वृक्ष लागवडीचे महान कार्य परिसरातील स्वयंसेवकांच्या सहभागातून घेण्यात आले. याप्रसंगी तीनही संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेविका महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या
समाज सेवक भूमिपुत्र वाघ समाजसेविका माळगेताई यांच्या विनंतीला मान देऊन परिसरातील कार्यकर्ते उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.
हा विचाराचा महोत्सव, वृक्ष संवर्धनाचा महोत्सव, वृक्ष लागवडीचा महोत्सव, ऑक्सिजन निर्मितीचा महोत्सव, माणसातील माणूसपण जागवणारा महोत्सव म्हणून याकडे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या पृथ्वीवर हरित क्रांती करावी यासाठी या तिन्ही संघटना कार्यरत असल्याची माहिती भूमीपुत्र वाघ यांनी दिली.









