राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे मध्ये जकेकुरवाडी ता. उमरगा ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांक.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धाचे आज पारितोषिक वितरण

जकेकुरवाडी या गावांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष सर, अति.मुख्य कार्यकारीअधिकारी श्री.विलास जाधव सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री.श्याम गोडभरले सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.मनोज राऊत सर व तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.प्रशांतसिंह मरोड सर व व जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी व गावचे सरपंच अमर सुर्यवंशी ग्रामसेवक गणेश माळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून गावामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विविध विकास कामे झालेली आहेत. यात ग्रामस्थांचा हीरीनेने सहभाग यातूनच ग्रामपंचायतीला विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

गावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विभागीय आयुक्त दिलीप गावडे सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला,

जकेकुरवाडीसह विभागातील सहा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.

संत गाडगेबाबा

ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ चा पारितोषिक वितरण समारंभ टीव्ही सेंटर रस्त्यावरील मौलाना आझाद सभागृहात आज गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी 10.00 झाला.

विभागातील सहा ग्रामपंचायतींचा यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जकेकूरवाडी (ता. उमरगा, जि. धाराशिव) ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दुधड (ता. छत्रपती संभाजीनगर), तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक चौंढी शहापूर (ता. औंढा, जि. हिंगोली) ग्रामपंचायतीस दिले जाईल. स्व. वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार जवळगाव (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) या ग्रामपंचायतीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता विशेष पुरस्कार सिकंदरपूर (ता. लातूर), तर स्व. आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार रामपुरी (ता. मानवत, जि. परभणी) ग्रामपंचायतीस प्रदान केला.

Join WhatsApp

Join Now