!! उमरग्याचा इतिहास !!
आपली मुळ सिंधु संस्कृती ही स्त्रीसत्ताक ! शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला आणि अन्नासाठी भटकणाऱ्या माणसाची भटकंती थांबली. माणुस स्थिरावला तसा नागरी संस्कृत्यांचा उदय झाला. उत्पादनाचे स्त्रोत असलेल्या जमीनीवर खाजगी मालकी निर्माण होवून तिच्या रक्षणासाठी कायदे आणि ‘राज्य‘ या संस्थेचा उदय झाला. मातृसत्ताक संस्कृती असल्याने स्त्रीयाच राज्यकर्त्या होत्या. नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या वेगवेगळ्या प्रदेशाच्या व गणाच्या प्रमुख म्हणुन निऋती, शुर्पनखा, ताटका, उर्वशी, मावळाई, अंबाबाई आणि तुळजाभवानी ह्या गणनायिका होत्या. त्यातले तुळजापुर अन आसपासचे क्षेत्र हे “तुळजाभवानी” च्या आखत्यारीतले. अतिशय न्यायप्रिय आणि आपल्या प्रजेला भेदभाव न करता सर्वांना “तोलून” समान हक्क – अधिकार देणारी ही गणनायिका. तुळजाभवानीच्या मुख्य स्थानापासुन म्हणजेच तुळजापुरपासुन अवघ्या ७२ किलोमिटरवर वसलेले “उमरगा” हे शहर मागास समजलेल्या मराठवाड्यातले अन त्यातल्या त्यात देशातील मागास म्हणुन घोषित झालेल्या उस्मानाबाद मधले एक नावाजलेले शहर होय. कर्नाटक, आंध्रप्रदेशचे तुळजाभवानीचे भावीक त्यांच्या मातेकडे म्हणजेच
“उमामातेकडे” ज्या मार्गाने जातात तो मार्ग म्हणजे “उमा-मार्ग”. या “उमा-मार्ग” शब्दाचा अपभ्रंश होवून पुढे “उमरगा” हा शब्द प्रचलित झाला.
कधीकाळी इथे जनावरांचा मोठा व्यापार होत असे म्हणुनच याला “ढोर उमरगा” असेही म्हंटले जाते. उमरगा कर्नाटक सिमेपासुन अवघ्या २० किलोमिटरवर असल्याने आणि पुर्वीच्या निझामी राज्याचा भाग असल्याने इथे सांस्कृतिक अर्थाने संमिश्रता आढळते. भाषेवरही कन्नड आणि उर्दू भाषेचा प्रभाव आढळतो. महात्मा बसवेश्वरांचे कार्यस्थळ इथुन जवळच असल्याने लिंगायत धर्माचा अन चळवळीचा प्रभावही इथे दिसुन येतो. त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही वारकरी सांप्रदायाचा प्रभाव आढळतो. शहाराच्या ठिकाणी प्रसिद्ध दर्गा आहे. गावोगाव मुस्लिम लोकवस्ती, मशीदी आहेत. शिवाय व्यापार धंद्यासाठी बाहेरुन आलेले इतर धर्मीयही आहेत. अशाप्रकारे हिंदू, लिंगायत, मुस्लिम अन इतर सर्व धर्मीय लोक इथे गुण्यागोविंद्याने राहतात.
उमरग्यातील लोक मेहनती, चिवट आणि प्रगतीशील आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थाने भारतात सामील व्हायला नकार देत होती. त्यातले एक हैद्राबादच्या निझामाचे संस्थान होते. ‘कासिम रझवी‘ ला पुढे करुन निझामाने त्याच्या संस्थानाच्या रक्षेसाठी “रझाकार”ही संघटना स्थापन केली. निझाम आणि रझाकार यांनी सगळीकडे थैमान घातला. जनता बेचिराख झाली. पण या अत्याचाराविरुद्ध आणि लोकशाही भारतात सामील होण्यासाठी उमरग्यातील सर्व जाती-धर्माचे लोक चिवटपणे लढले. त्यामुळे उमरग्याच्या राजकारणाला ‘समतावादी‘ संस्कृती आणि ‘जनवादी, त्यागी राजकारणा‘ची पार्श्वभुमी आहे.
THANKS
शितल श्यामराव चव्हाण