माझा उमरगा उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका

 उमरगा तालुका 

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

उमरगा शहर हे उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

helloomerga

उमरगा शहरामध्ये शासकीय उपजिल्हा रुग्‍णालय आहे.उमरगा बसस्थानकाजवळ
हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर पुरातन असून
,
रचना एखाद्या राजवाड्यासारखी आहे. प्रत्येक दगडावर आकर्षक कोरीव
नक्षीकाम आहे. येथे शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. मंदिराला एकूण सात
दरवाजे आहेत. येथे ब्रम्हा
, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती
आहेत. वनवासाच्या वेळी राम
, लक्ष्मण येथे येऊन गेल्याची
अख्यायीका आहे. सन २००० मध्ये २५ लाख रुपये खर्चून पाच शिखरांचे एकच भव्य मंदिर
बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये राम
, लक्ष्मण सीतेसह
विविध देवतांच्या मूर्ती आहेत.या गावी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम
हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती
, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर राष्ट्रकूट, चालुक्य घराण्याशी संबधित आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव
होतो
, तेव्हा भक्तांची गर्दी असते.

बालाघाट पठाराचा प्रदेश उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.

हवामान उष्ण व कोरडे.

नदी बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…ही नदी उमरगा तालुक्यातून
वाहते.

उमरगा तालुक्यातील धरणे जकेकूर, तुरोरी, कोळसूर, बेनीतुरा, सावळसूर…

पिके ज्वारी, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा.

नगदी पिके ऊस, द्राक्षे, केळी..

प्राणी हरीण, रानडुक्कर, माकड, वानर, खार.

पक्षी मोर, पोपट, कबूतर.

अचलबेट उमरगा शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलबेट नावाचा डोंगर आहे. येथील
गुंफेमध्ये अनेक वर्षांपूर्वी साधू
, तपस्वी तप करीत असत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या मध्यावर ही
गुंफा आहे. यामध्ये धुनी व शिवलिंग स्थापन केले आहे. गुंफेवर पाच शिखरांचे भव्य
मंदिर उभारण्यात आले आहे. मनमोहक झाडी व फुलांनी हे स्थळ नटले आहे. मंदिरावर
जाण्यासाठी डोंगराच्या मध्यातून पायऱ्या व वाहनांसाठी डोंगराच्या बाजूने रस्ता
बनवण्यात आला आहे. सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वी काशीनाथ महाराज या गुंफेमध्ये
यज्ञकुंड पेटवून जप करत असत. येथे विठ्ठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर
बालाघाट डोंगरामध्ये आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे..

कसगी जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध, येथे सिद्धेश्वराचे
प्राचीन मंदिर आहे.

येणेगुर  जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

तुरोरी हे ठिकाण पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहे.

उमरगा शहरामध्ये दर रविवारी उस्मानाबाद जिल्हातील सवांत मोठा आठवडी
बाजार भरतो..

उमरगा
हा एक् बाजारपेटेने सामावलेला आहे. उमरगा शहरात् पचायत् समिती आहे. मुंबई ते
हैद्राबाद महामार्ह न. ६५ उमरगा शहरातून जाते. उमरगा शहारातील लोक भाषा मराठी आहे.
येथील लोक प्रमुक्याने मराठी बोली बोलतात. येथील प्रमुख मंदिरे म्हणजे महादेव
मंदिर आणि दत्त मंदिर.

 

Join WhatsApp

Join Now