उमरगा आगारात दाखल झाल्या ५ नव्या इलेक्ट्रिक बसेस; प्रवाशांच्या सेवेत दाखल

उमरगा │ दि. २५ जुलै २०२५
उमरगा आगारासाठी मंजूर झालेल्या १० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ५ बस शुक्रवारी (दि. २५) उमरगा आगारात दाखल झाल्या आहेत. या नव्या पर्यावरणपूरक बसेसचे औपचारिक पूजन महादेव पंच कमिटीचे बाबुराव सुरवसे, बळीराम कोराळे व व्यंकट शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर तात्काळ या बसेस प्रवाशांच्या सेवेतही दाखल करण्यात आल्या.

ही वाहतूक सेवा शहर व ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त ठरणार आहे. या बसांचा प्रवासात सौम्य आवाज, आरामदायक आसने आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे.

या कार्यक्रमप्रसंगी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, आमदार प्रवीण स्वामी, आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी, तसेच शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शहरप्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, माजी नगरसेवक बालाजी तात्या सुरवसे, तसेच चंद्रशेखर सुर्यवंशी, व्यंकट पाटील, नाना मदनसुरे, शरद पवार, अमर शिंदे, काशिनाथ पाटील, महेश पाटील, अरूण जगताप, प्रदीप शिवनेचारी, शहाजी येळीकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणसंवेदनशीलतेचा विचार करत ही पायरी अत्यंत स्वागतार्ह असून, लवकरच उर्वरित ५ इलेक्ट्रिक बसही उमरगा आगारात दाखल होणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली.

Join WhatsApp

Join Now