केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रवीण गुरुजी स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील महत्वपूर्ण प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली!
✅ उमरगा बाह्यवळण रस्ता:
➡️ १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महामार्गातील समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष!
➡️ मुळज त्रिकोण, कोरेगाव, वागदरी, गुगळगाव यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सर्विस रोड आणि हायमास्ट दिवे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले!
➡️ महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेतात पाणी साचून नुकसान होत आहे!
🔥 शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेलेल्या या समस्येवर आमदार प्रवीण गुरुजी स्वामी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसमोर ठोस भूमिका मांडली!
🗓️ १०-११ फेब्रुवारीला नवी दिल्ली येथे नव्या आमदार आणि विधान परिषद सदस्यांसाठी आयोजित प्रबोधन शिबिरात रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करत असताना, या महत्त्वाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्यात आली!
⚡ लोकांच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा लढा सुरूच राहील!









