उमरगा तहसील कार्यालय येथे बैठक I प्रशासकीय अधिकारी व उमरगा शहरातील मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्ती यांच्यासमवेत घेण्यात आली.

उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना चे तीन रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासकीय अधिकारी व उमरगा शहरातील मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्ती यांच्यासमवेत तहसील कार्यालय, उमरगा येथे बैठक घेतली.
प्रशासकीय अधिकारी व उमरगा शहरातील मुस्लीम समाजातील प्रमुख 
व्यक्ती यांच्यासमवेत तहसील कार्यालय, उमरगा येथे बैठक घेतली.

सदर बैठकीत मुस्लिम समाजातील नागरिकांनी प्रशासनाकडून कुठलीच माहिती लपवू नये व प्रशासनास सहकार्य करावे. विशेषतः बाहेरून जमात ,इस्तिमा करून काही मंडळी आली असेल व त्यांनी तपासणी केले नसेल तर त्वरित करून घ्यावे, जेणेकरुन प्रशासनास मदत होईल.
तसेच काही मंडळी पुणे ,मुंबई व इतर ठिकाणाहून गेल्या १५ दिवसात तालुक्यात व शहरात आले आहेत . त्यांनी स्वतः होवून उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करावी . लाजेखातर व घाबरून घरीच थांबू नये असे आवाहन केले.
जगातील कोणत्याही अनिष्ट रूढी परंपरांपासून उमरगा व लोहारा तालुक्यातील मुस्लिम बांधव नेहमी अलिप्त राहिले आहेत असा आपला इतिहास असून येथील मुस्लिम व हिंदू प्रेमाने व आपुलकीने राहतात. तेंव्हा मुस्लिम कमिटीने त्यांच्याकडे धार्मिक कार्यास बाहेर गावी गेलेल्यांची माहिती उपलब्ध झाल्यास त्वरित प्रशासनास द्यावी व त्यांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी केले.
या बैठकीस युवानेते किरण गायकवाड ,उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले ,तहसीलदार संजय पवार ,पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले ,पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले ,नगरपरिषदचे मुख्याधिकारी पाटील,नायब तहसीलदार रोहन काळे ,तरंगे ,माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार ,बाबा औटी ,निजाम व्हंताळे ,अलिम विजापुरे ,याकुब नदाफ, आदी उपस्थित होते.

  @Dnyanraj Chougule – ज्ञानराज चौगुले

Join WhatsApp

Join Now