जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटिने प्रशासनाच्या आव्हानाला दिला प्रतिसाद.


जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स
सोसायटिने प्रशासनाच्या आव्हानाला दिला प्रतिसाद…..
गोरगरीब 100 कुटुंबाला केले
धान्य वाटप



गोरगरीब 100 कुटुंबाला केले धान्य वाटप



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक
मोलमजुरी करून खाणारे गरीब कुटुंबीय (विशेषतः शहरी भागातील) याना सध्या दोन वेळचे
जेवण मिळने कठीण झाले आहे.याना आधार मिळावा म्हणून शासन आपल्या स्तरावर प्रयत्न
करतच आहे.परंतु यासाठी विविध सामाजिक संघटना व संस्थानी पुढे येऊन हातभार लावावा
असे आवाहन प्रशासनाने केले आहे.तसेच उमरग्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व
तहसीलदार संजय पवार  यांनी केलेल्या
आव्हानास प्रतिसाद म्हणून सामाजिक बांधीलकी असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स
सोसायटीच्या वतीने त्यांच्या शेष फंडातून अन्यधान्य व जीवनावशक्य वस्तूचे
100
किट आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी युवा नेते
किरण गायकवाड
,सोसायटीचे चेअरमन पद्माकर मोरे सर व सर्व
सोसायटीचे डायरेक्टर्स
,जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक
उपस्थित होते.

सामाजिक बांधीलकी जपून व
प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जि.
परिषद  हायस्कूल टीचर्स सोसायटीचे मनस्वी
आभार मानले.





@जि. परिषद  हायस्कूल टीचर्स सोसायटी

Join WhatsApp

Join Now