महाराष्ट्रातही
लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना याची घोषणा केली. महाराष्ट्रात सर्वाधिक
कोरोना रुग्ण असल्यामुळं लॉकडाऊनमध्ये वाढ गरजेचीच होती. राज्यात मुंबई, पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण
आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे
प्रमाण अधिक अशी परिस्थिती आहे.

30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.
मला महाराष्ट्रातील रुग्णांची
संख्या शुन्यावर आणायची आहे. आता घरोघरी जाऊन आपण लक्षणे असलेल्या रुग्णांपर्यंत
पोहचत आहोत. रुग्णांनी आपल्याकडे येण्याची वाट आपण पाहत नाही. डॉक्टर
रुग्णांपर्यंत जात आहेत. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात
लॉकडाऊन कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. जीवनावश्यक वस्तूंची कामं, शेतीची कामं सुरूच राहणार. महाराष्ट्रात कोठेही गोंधळ नको आहे. राज्य
धोरोदात्त आहे. हा धीर कामय ठेवा. या साखळी तोडणं आपल्या हातात आहे. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
देशात ओडिशा आणि
पंजाब या दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्यापूर्वीच राज्यात
लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली होती. ओडिशाने पहिल्यांदा हा निर्णय घेतला.
त्यानंतर पंजाबने त्याची घोषणा केली होती. मुळात देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची
संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. देशात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळला
होता. त्यानंतर देशात सगळीकडं जसजसे विदेशातून प्रवासी येतील, तसा सगळीकडचं आकडा वाढू लागला. भारतात
सुरुवातीच्या टप्प्यात विदेशातून आलेल्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत
होते. पण, गेल्या आठवड्यापासून भारतात सामूहिक
संसर्गाच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या भारतात असेलल्या एकूण कोरोनाग्रस्त
रुग्णांपैकी 38 टक्के रुग्ण कोठेही विदेशात प्रवास
केलेले नाहीत. त्यामुळं सध्या 15 राज्यांतील 36 जिल्ह्यांत आढळलेले रुग्ण कधीही परदेशी गेलेले नाहीत. त्यामुळं कोरोनाचं
देशावरील संकट आणखीनच गडद झाले आहे. त्यामुळंच भारतात कोणत्याही परिस्थितीत
लॉकडाऊन वाढवण्याची गरज होती.