उमरगा (प्रतिनिधी): लातूर येथील नामवंत व अग्रगण्य नेटीझन्स
फाऊंडेशन अॅकॅडमीच्या उमरगा शाखेचा शुभारंभ गजानन कोचिंग क्लासेस यांच्या
सहयोगातून होणार आहे. त्याचा उद्घाटन समारंभ रविवार ता. २५ फेब्रुवारी सायंकाळी ६
वाजता शांताई मंगल कार्यालय,
उमरगा येथे होणार आहे. याप्रसंगी नेटीझन्स फाऊंडेशन अॅकॅडमीचे संस्थापक संचालक
प्रा. एस. जे. तोडकर सर मार्गदर्शन करणार आहेत. यात नेटीझन्स फाऊंडेशन अॅकॅडमी
मध्ये गेली १२ वर्ष स्टेट बोर्ड,
सेमी इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई या अभ्यासक्रमाचा इंटीग्रेटेड
अभ्यास विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. याचा
उपयोग उमरगा शहरातील सुजान पालक व विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून गजानन कोचिंग
क्लासेस व नेटीझन्स फाऊंडेशन यांच्या सहयोगातून गजानन कोचिंग क्लासेसच्या नूतन चार
मजली इमारतीत नेटीझन्स फाऊंडेशन अॅकॅडमी सुरू होणार असून मार्गदर्शक तज्ञ शिक्षक
उपलब्ध असणार आहेत.
शालेय पातळीवरील स्पर्धा परीक्षा, नीट, सीईटी,
जेईई यात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची संधी व नवीन शैक्षणिक
धोरण यावर नेटीझन्स फाऊंडेशन अॅकॅडमीचे संचालक प्रा. एस. जे. तोडकर सर सखोल
मार्गदर्शन करणार आहेत. गजानन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना पुणे, हैदराबाद
अशा शहरात जाणे शक्य नसल्याने गजानन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा मानस संचालक श्री. अजय भोसले, श्री. प्रविण गायकवाड, श्री राजेंद्र साळुंके यांनी सांगितले
आहे.
या सुवर्णसंधीचा लाभ सुजाण पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावा
असे आवाहन नेटीझन्स फाऊंडेशन अॅकॅडमी व गजानन कोचिंग क्लासेसच्या वतीने करण्यात
येत आहे.








