७०-३०% चा फाॅर्मुला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला
एम.बी.बी.एस. (MBBS) च्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात 70:30 वाटा हे सूत्र राबवले जात होते, यामुळे डॉकटर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. ही बाब लक्षात घेऊन सदरचे विभागनिहाय आरक्षण रद्द करणेबाबत मी व मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींकडून अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता.
आज विधिमंडळात झालेल्या बैठकीत सदरचा ७०-३०% चा फाॅर्मुला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे मराठवाड्यातील डॉकटर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार आहे.
हा निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, यांचा मी आभारी आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री अमितजी विलासरावजी देशमुख यांचीही भेट घेऊन या निर्णयाबद्दल आभार मानले, यावेळी आमदार राहुल पाटील जी, आमदार संतोष बांगर जी, आमदार धीरज देशमुख जी आदी मराठवाड्यातील आमदार महोदय उपस्थित होते.