आकाश कंदिलांनी सजली उमरगा शहराची बाजारपेठ

मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. 

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीसाठी उमरगा शहर बाजारपेठ विविध आकारातील आकाश कंदीलांनी सजली आहे. मोठ्या आकाश कंदीलांबरोबरच  छोट्या आकारातील आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे.

 मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण दीपोत्सवाने उजळून टाकला जातो. दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदीलांची मागणी वाढते.पारंपरिक आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाश कंदीलात पहावयास मिळतात. 

हंडी कंदील, पर्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रतिसाद असतो. हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार, रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, झगमगते आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now