येथील शांताई मंगल कार्यालयात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीशभाऊ चव्हाण यांनी पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, मा.शोकत पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवा नेते शरद पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, शिवसेना युवानेते किरण गायकवाड, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव शहापुरे, प्रा. सतीश इंगळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, दिलीप भालेराव, रमेश शिंदे यांच्यासह पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांची यावेळी उपस्थिती होती.
#MLC #satishchavan #Sach #osmanabad #omerga #shantaimangalkaryalay








