उमरगा तालुक्यातील २५ वाचनालयांना एकूण १७५ पुस्तकांचे वितरण.

 उमरगा तालुक्यातील २५ वाचनालयांना एकूण १७५ पुस्तकांचे वितरण 

आज डॉ. संगीता गावकरे-चव्हाण तसेच चि. रवी रामराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा तालुक्यातील २५ वाचनालयांना खालील सात पुस्तकांच्या संचाचे (एकूण १७५ पुस्तके) Lawyers Association for Justice (LAJ) च्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.

omerga


(१) वळंबा (आत्मकथन) – प्रा. शिवमूर्ती भांडेकर गुरुजी 
(२) या परावलंबी दिवसात (कवितासंग्रह) – डॉ. बालाजी मदन इंगळे 
(३) कॉम्रेड (कवितासंग्रह) – ॲड. शीतल चव्हाण 
(४) शिवाजी कोण होता? – कॉ. गोविंद पानसरे 
(५) मंथन – ॲड. शीतल शामराव चव्हाण 
(६) शहीद भगतसिंह – दत्ता देसाई 
(७) मी वाचलेली उमरग्यातील माणसं – शीतल चव्हाण 

omerga



या प्रसंगी प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज च्या अध्यक्षा मातोश्री शांताबाई शामराव चव्हाण, जनता वाचनालयाचे मा. प्रविण अणदूरकर, तालुका ग्रंथपाल संघाचे मा. लिंबराज सोमवंशी यांच्यासह तालुक्यातील विविध वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. किशोर औरादे यांनी, प्रास्ताविक मा. शशीराज शाम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मा. सत्यनारायण जाधव यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनुराधा पाटील, शांतय्या स्वामी, करीम शेख, शशीराज पाटील, किशोर औरादे, सत्यनारायण जाधव, संतोष चव्हाण यांनी प्रयत्न केले.


Join WhatsApp

Join Now