जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अंतर्गत उमरगा शहरातील विविध विकासकामांसाठी 8.50 कोटी रुपये इतका निधी मंजूर असून या निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या पतंगे रोड व झोपडपट्टी रोड या दोन रस्त्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख- पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सम्पन्न झाला.
यावेळी मा.खा.प्रा.रवींद्र गायकवाड, युवा नेते किरण गायकवाड, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख तथा सरपंच जेवळी मोहन पनुरे, रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी उमरगा, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, संतोष सगर, बाजार समिती संचालक सचिन जाधव, बसवराज वरनाळे, शेखर मुदकांना, शरद पवार, योगेश तपसाळे, बळीराम सुरवसे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, गोपाळ जाधव, पतंगे रोड रहिवासी संघर्ष समितीचे मनोज जाधव, दत्ता रोंगे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, महावीर अण्णा कोराळे, रत्नाकांत सगर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







