कु.माधवी चालुक्य कन्या हायस्कूल, उमरगा येथे आंतरराष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.

आज दि. 22/12/2021 रोजी निपुण भारत अभियानांतर्गत महान शास्ञज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती व आंतरराष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी विस्तार अधिकारी श्री महाबोले साहेब आणि श्री मम्माळेसाहेब यांनी प्रशालेस अचानक भेट दिली आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पदभार आणि सत्कार स्वीकारला व विद्यार्थिनीना अनमोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्याशी संवाद साधला,स्वाध्याय सोडवण्याबाबत प्रेरणा दिली.एकंदरीत शाळेतील सर्व उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी गणित शिक्षक श्री गायकवाड जितेंद्र, श्री वनकुंद्रे शीतल यांचा सत्कार करण्यात आला.श्री गायकवाड जितेंद्र यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे व्यवहारातील महत्त्व सांगितले. श्री साळुंके राजेंद्र यांनी सुञसंचालन केले. श्री गुंजोटे सतिश यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केले. 

गणितोत्सवानिमित्त गणित पोस्टर स्पर्धा, गणिती उखाणे स्पर्धा श्री वनकुंद्रे शीतल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. श्रीमती सोनाली तेली व श्रीमती साळुंके सुनिता यांनी स्वतंत्र भारत अमृत महोत्सव रांगोळी स्पर्धा आणि गणितीय रांगोळी स्पर्धा घेतल्या. श्री महेश जाधव यांनी कोरोना नियमानुसार विद्यार्थी शिस्तीत बसवले.श्री यादव धनराज यांनी आभार प्रदर्शन केले. एकंदरीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Join WhatsApp

Join Now