मतदारसंघाचे प्रश्न
🚩शेतकऱ्यांसाठी कृषी महामंडळ स्थापन करण्यात करणे, शेती आणि शेतकरी याविषयी तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे.
🚩मोर,वानर,डुक्कर, रानडुक्कर यांच्यामुळे शेतीची प्रचंड प्रमाणात नुकसान होते, यांच्यामुळे झालेल्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून नुकसान भरपाई देता येईल काय याचा विचार करावा.
🚩 राज्यातील अंगणवाडी,शाळा येथे देण्यात येणारा शहालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याबाबत
🚩 राज्यातील प्राथमिक शिक्षकांना टीईटी बंधनकारक केले आहे त्याबाबत पुनर्विचार करणे.
🚩 पाच डिसेंबर रोजी शिक्षकांनी केलेल्या संपाची एक दिवसाची पगार कपात न करणे बाबत.
🚩 लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांची फार्मर आयडी निघत नसल्याबाबत गंभीर दखल घेऊन म्हणजे कारवाई करणे.
🚩 तलाठी कार्यालयांच बांधकाम करून ते कार्यालय अत्याधुनिक करणे, गावांतर्गत रस्ते,राज्य मार्ग ते गाव रस्ते,या मार्गात येणारे पूल दुरुस्त करणे.
🚩 राज्यातील विनाअनुदानित आश्रम शाळांना अनुदान देणे बाबत
🚩 कला, कार्यानुभव व क्रीडा निरीक्षकांची नियुक्ती केली गेलेली आहे. त्यांचे सरसकट मानधन वीस हजार रुपये इतके करणे.
🚩 उमरगा शहराच्या पश्चिमेस असलेल्या अरुंद पूलाला एक समांतर पूल बांधण्यासाठी योग्य निधीची तरतूद करा.
🚩 स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना नोकरीत सामावून घेणे,6/11/ 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे.
राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन वाढवणे,त्यांच्या कुटुंबांना कॅशलेस स्कीम लागू करणे, पदाचे नूतनीकरण रद्द करणे,शारीरिक पात्रतेनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार इतर पदांच्या भरती प्रक्रियेत कमीत कमी पाच टक्के आरक्षण देणे.
🚩 उमरगा लोहारा तालुक्यातील 1993 सप्टेंबर मध्ये झालेल्या भूकंपातील नागरिकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये कमीत कमी पाच टक्के आरक्षण देणे.
🚩 राज्यात NHM अंतर्गत ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यांच समायोजन करणे या संदर्भात त्रुटी दुरुस्तीचा जीआर काढून दोन वर्षे झाली आहे त्यांची समायोजन करीत करण्यात यावे.
🚩 राज्यातील ग्रामपंचायती मधून डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर हजारो कर्मचारी दहा हजार रुपये मानधनावर कार्यरत आहेत. त्यांचे मानधन वाढवून कमीत कमी 25 हजार रुपये करण्यात यावे तसेच ते नियमितपणे द्यावे.
🚩 समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यात 6433 कर्मचारी कार्यरत होते पैकी 3105 कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.उर्वरित 3378 कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे. त्यांना शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावेत
🚩नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी.
🚩 मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.
🚩 राज्यातील हजारो शाळा या जवळपास 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत,त्यानंतर अतिवृष्टीमुळे या सर्व शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. यातील काही इमारती पडलेल्या आहेत यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने आधुनिक पद्धतीने या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी.
🚩 मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंप नंतर जे कर्मचारी भूकंपग्रस्त म्हणून लागलेले आहेत ते सेवेत रुजू होताना त्यांचे वय 35 ते 40 च्या दरम्यान असल्याने त्यांची शासकीय सेवेतील वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी.
🚩 १९९३ च्या भूकंपात उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक गाव उद्ध्वस्त झाली. त्यापैकी 37 गावाचे पुनर्वसन 1993 ते 1995 दरम्यान झाले. या गावांचा नव्याने पुनर्विकास आराखडा तयार करून या गावांचा विकास करावा त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी.
🚩 लोहारा शहर येथे अत्याधुनिक विश्रामगृहाची निर्मिती करण्यात यावी. तसेच शेतीविषयक संशोधनासाठी कृषीभवनाची उभारणी करण्यात यावी.
🚩 तुम्हाला तालुक्यामध्ये काही मोजकेच ठिकाणी हुतात्मा स्मारक आहेत, त्यांच्यासाठी विशेष पॅकेज देऊन दुरुस्ती करण्यात यावी.
🚩 शिक्षण,महसूल, भूमापन,मोजणी, आरोग्य,पंचायत, महावितरण, जलसंपदा या विभागात अनेक अधिकारी,कर्मचारी यांची पद रिक्त आहेत ही सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत.
🚩 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी BARTI,SARATHI,MAHAJYOTI या संस्थांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती,विशेष मागास प्रवर्ग च्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी दिली जाणारी फेलोशिप 2022 पासून बंद आहे ही फेलोशिप तात्काळ सामाजिक भेदभाव न करता अदा करण्यात यावी.
🚩 राज्यातील अनेक ज्येष्ठ यांच्या वृद्धांच्या आधार कार्ड नूतनीकरण करताना बोटांचे ठसे उठत नाहीत,डोळ्यांचे स्कॅनिंग होत नाहीत यामुळे त्यांच्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी करत असताना केवायसी करता येत नाही म्हणून हे ज्येष्ठ आणि वृद्ध लाभाच्या योजना पासून वंचित राहतात यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
🚩 उमरगा लोहारा तालुक्यातील NH65 हा राष्ट्रीय महामार्ग साठी दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर आष्टा मोड तालुका लोहारा या ठिकाणी अत्याधुनिक बस स्थानकाची निर्मिती केली जावी तसेच या गावांची लोकसंख्या पाच ते दहा हजार आहे या गावांमधून मिनी बस स्थानकांची उभारणी करण्यात यावी.
🚩 उमरगा तुळजापूर सीमेवर नळदुर्ग येथे स्पेशल हायवे पोलीस महामार्गावर थांबून बाहेर राज्यातील गाड्या अडवून त्यांची लूट करतात ती प्रशासनाने लक्ष देऊन थांबवावी.
🚩 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी माहिती मिळते आहे जी शेतकरी तत्मकीदार आहे त्यांच्यासोबतच नियमित कर्ज भरणा करणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा योग्य तो फायदा मिळावा.
🚩 राज्यातील शाळांमधून 37 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.ही पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाहण्यात यावीत.
🚩 शिक्षण सेवक हे पद म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर झालेला अन्याय आहे करिता ही योजना रद्द करण्यात यावी,शक्य नसल्यास यांचा कालावधी कमी करून कमीत कमी 40 हजार इतके मानधन करण्यात यावे.
🚩 राज्यातील अनेक नगरपालिका/ नगरपंचायतीमधून हजारो कंत्राटी कर्मचारी मानधनावर काम करतात हे कर्मचारी गटार काढणे,स्वच्छता करणे,आरोग्य दिवाबत्तीची कामे करतात,कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये हे कर्मचारी काम केले आहेत.यांना टप्प्याटप्प्याने नियमानुसार सेवेत कायम करण्यात यावे.
🚩 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक यांची पदे आहेत चौथ्या वेतन आयोगात यांचे वेतन शिक्षक तलाठी ग्रामसेवक यांच्या बरोबरीने होते.चौथा, पाचवा,सहावा, सातवा वेतन आयोग लागू झाला परंतु या कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक तुटी राहून गेल्या यांचे वेतन इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमीच राहिले या त्रुटी दूर करण्यात यावेत. यांच्या पदाचे एकत्रिकरण करून पदाचे प्रशासन अधिकारी असे नामकरण करण्यात यावे.
🚩 राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवेढा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली होती त्याला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण त्यापुढे काही कारवाई झाल्याची दिसत नाही करिता हे महामंडळ कार्यान्वित करून शंभर कोटी इतका भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.
🚩मुख्यमंत्री विज्ञान वारी यामध्ये अमेरिका येथील NASA मध्ये 51 विद्यार्थी अभ्यासासाठी पाठवण्याचे प्रयोजन आहे ही विद्यार्थी संख्या वाढवून 101 इतकी करण्यात यावी.
🚩 राज्यातील जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाइन पद्धतीने झाल्याने बदली पात्र आहे सर्व शिक्षकांच्या बदल्या होत आहेत.यामुळे काही शाळांमधून शंभर टक्के शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. ऑनलाइन बदली प्रक्रिया बंद करून पूर्वीप्रमाणे समुपदेशाला बदल्या करता येतील काय हा महत्वपूर्ण प्रश्न मांडला.
यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.








