श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा


दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थी इयत्ता दहावी वर्ष २००३-२००४ बॅच चा २१ वर्षांनी सर्व माझी विधार्थी , शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती अरुणाताई देविदासराव जाधव -माडीवाले अध्य्क्ष ज्ञानदीप शिक्षण संस्था यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव तथा मा. मुख्याध्यापक भातलोंढे सर होते .मा. मुख्याध्यापक एस .वाय .जाधव सर, मा. मुख्याध्यापक एच.व्ही पवार सर, मा.मुख्याध्यापक एन.एम.माने सर, गठडे सर, राठोड सर, आर.जी. माने सर, देशमाने सर ,तेगाडे सर,के .एन जाधव सर,बी.एस. जाधव सर ,शिवाजी जाधव सर , ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिरे मॅडम, पर्यवेक्षक मुरमे मॅडम,मोहिते मॅडम,अभिजित जाधव सर ,कल्पना मॅडम, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन निळकंठ (हरी) लुगदे यांनी पार पाडले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी मांडले. सर्व गुरुजनांचा, शिकेत्तर कर्मचारीचं शाल, शिर्फळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

विधार्थी मधून आप्पाराव लवटे, बाळासाहेब माने, सोनाली कांबळे, उषा पवार, दिपक स्वामी, रिंकू थोरे, शिवा स्वामी , राहुल सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणीला उजाळा दिला तसेच एस.वाय जाधव सर , गठडे सर , भातलोंढे सर यांनी पैसे ची बचत, एकमेकांना मदत , अश्या अनेक विषयावर मार्गदर्शन करत गुरु आणि विधार्थी याचे महत्व सांगून जुन्या आठवणीला उजाळा दिला. शेवटी सुवर्णा जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमात पाऊसाचा व्यतय आला तरी सर्व विधार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नंतर भोजनाचा आनंद घेऊन स्न्हे मेळाव्याची सांगता झाली. आजूबाजूच्या खेडे गावातील २००३-२००४ चे माझी विधार्थी ची उपस्थिती लक्षणीय होती.

हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, निलकंठ लुगदे,सुवर्णा जाधव, गोदावरी अंबुलगे, आप्पा लवटे, राहुल सूर्यवंशी, अतुल जाधव, शिवकन्या स्वामी, अमर शिंदे, अतुल जाधव, अभिजित इंगळे ,कृष्णा पाटील,अतुल मोरे,प्रफुल्ल साठे,मनिषा जाधव -तळभोगे, ललिता कांबळे, शिल्पा माळी, श्रीदेवी लवटे , विशाल वासगी, उमेश, नागदे , नेताजी , गुंडू लेंडवे , नितीन स्वामी, दिवटे , महेश पाटील ,सोम कस्तुरे यांच्या सह कार्यक्रम सर्वांचा असल्यामुळे सर्वांनी प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now