उमरगा: तालुक्यातील जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात इ. 2003-04 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात आणि भावनिक वातावरणात दि. 25 आक्टोबर 2025 वार शनिवार रोजी संपन्न झाला. जवळपास वीस वर्षानी हे माजी विद्यार्थी एकत्र येत आठवणींना उजाळा दिला तसेच शिक्षक -विद्यार्थी बंध अधिक दृढ झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. व्ही. टी. घोडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी. मुख्याध्यापक कमलाकर भोसले, प्राचार्य शेख एस आय, छ. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शहाजी पाटील, सरपंच अनिलभाऊ बिराजदार, माजी सरपंच राजेंद्र समाने, विनोद पाटील, अयुब पटेल, शिवाजी चव्हाण, अंजिक्य पाटील, बबन पाटील आदी सह 2004 बॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व कार्यरत शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याने संपूर्ण वातावरण आनंदमयी आणि कृतज्ञेच्या भावनेने भारावून गेले होते. कार्यक्रमा दरम्यान कमलाकर भोसले, शेख एस. आय. , संजय बिराजदार, संतोष कांबळे, संतोष बिराजदार, व्ही टी. घोडके यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यानी शाळेला दिलेल्या बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगी बेरंगी रांगोळी व पानाफुलांनी शाळेला सजविण्यात आले होते. या वेळी प्रार्थना, तासिका घेण्यात आल्या. माजी विद्यार्थ्यानी विद्यार्थी दशेत जावून पुन्हा एकदा शाळेचे जूने दिवस अनुभवले. संगीत खूर्ची, स्वपरिचय, भेंड्या अशा विविध उपक्रमांनी हा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्वर कोळी यांनी केले, प्रास्ताविक गोविंद वाघमोडे यांनी केले तर आभार अनिल कोल्हे यांनी मांनले.
यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पटेल नासीर, सचिन जाधव, मल्लीनाथ स्वामी, राम जाधव, प्रेमनाथ कांबळे आदिनी पुढाकार घेतला.







