जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे खतांचा वापर करावा- सचिन पवार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत प्रात्यक्षिक घटकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने निवड झालेल्या शेतकरी गटांना बियाणे वाटप करण्यात येत आहे.
आज उमरगा तालुक्यातील मौजे भगतवाडी कोळेवाडी चिरेवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमांमध्ये जमीन आरोग्य पत्रिका नुसार खत व्यवस्थापन तसेच खरीप मोहीम बी बियाणे वाटप गटामार्फत करण्यात आले.


खरीप हंगामातील महत्त्वाची पिकांचे व्यवस्थापन,बियाणे निवड ,बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पवार यांनी केले.
या गाव स्तरीय बैठकीस सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पवार युवा प्रशिक्षणार्थी अमित पवार विमा प्रतिनिधी अभिमन्यू करनुरे तसेच गावातील महिला शेतकरी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏

Join WhatsApp

Join Now