येळी जवळील रामपूर गावामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहेत.शेतीसंबंधी खरेदी साठी,दवाखाना,बाजार, इत्यादी साठी गावकऱ्यांना उमरगा येथे यावे लागते.पण गावात एस टी ची सोय नसल्याने लोकांचे फार मोठे हाल होत होते.त्याचबरोबर गावामध्ये आठवी पर्यंतच जिल्हा परिषदेची शाळा आहे.पुढील शिक्षणासाठी मात्र येथील विद्यार्थ्यांना येळी, बलसुर, या ठिकाणी जावे लागते. बस नसल्याने विद्यार्थ्यांना सायकलवर,पायी बलसुरला जावे लागायचे.
येळीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाटीपर्यंत दीड किलोमीटरचे अंतर पायी चालत जावे लागायचे. वयस्कर मंडळी, आजारी व्यक्ती, यांचे आबाळ होत होते. गावातील नेतेमंडळी दोन वर्ष झाले यासाठी एसटी महामंडळाकडे मागणी करत होते. पण याची कोणीच दखल घेत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन, उमरगा व लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार मा.प्रवीण स्वामी यांनी डेपो मॅनेजर श्री प्रसाद कुलकर्णी यांना ताबडतोब रामपूर गावाला एसटी सुरू करण्या बाबत सूचना केली. श्री कुलकर्णी यांनी योग्य ती कारवाई कार्यवाही करून एसटी सुरू करून दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी दिनांक 16 जून दिवशी गावात बस आल्याचे पाहून पालकांना व विद्यार्थ्यांना फार मोठा आनंद झाला.
बऱ्याच वर्षांनी गावामध्ये एसटी आल्याचे पाहून गावकऱ्यांना फार मोठा आनंद झाला. बसची पूजा करून, पेढे वाटून, त्याचबरोबर आतिषबाजी करून गावकऱ्यांनी स्वागत केले.
यासाठी रामपूर गावचे उपसरपंच श्री अनंत भोसले, माजी उपसरपंच श्री संतोष भोसले, छावा क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री विष्णू भोसले, श्री विकास स्वामी, यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.