स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

  उमरगा आज दिनांक 07/02/2022 वार सोमवार रोजी भारताच्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना
वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा
, शरणप्पा मलंग विद्यालय
उमरगा
, कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिर उमरगा यांच्या
वतीने मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर
, श्री कविराज रेड्डी
सर शिक्षक व विद्यार्थ्यां यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली.


स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली.


    यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना
शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर म्हणाले की
, दूर गेले स्वर आता आठवणी मागे राहिल्या म्हणूनच शरणप्पा मलंग विद्यालयाने
विद्यार्थ्यासोबत गानकोकिळा लता मंगेशकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्या. लता
म्हणजे यांच्या नावातच ताल होता. ईश्वरीय सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर जरी आज आपल्यात नसल्या तरीही आठवणींच्या
रूपाने त्या सदैव आपल्या हृदयामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत राहणार आहेत. 

मास्टर
दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लतादीदी वर भावंडा सहित कुटुंबाची जबाबदारी
पडली तरीपण त्यांनी हे आव्हान खुप हिमतीने पेलले त्यांनी वडिलांचा संगीत
क्षेत्रातला वारसा पुढे चालू ठेवला आजन्म अविवाहित राहणे आणि भारत देशाच्या
गौरवासाठी संगीताचा वारसा चालविणे त्याग आणि सेवेची भावना आयुष्यभर त्यांनी जपली.
एकूण
36 भारतीय भाषांमधून चित्रपट क्षेत्रासाठी हजार ते
अकराशे चित्रपटातून पन्नास हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली म्हणून त्यांचे गिनीज
बुकमध्ये नोंद झाली तर भारतामध्ये सर्वोच्च समजला जाणारा भारतरत्न हा पुरस्कार
त्यांना अर्पण करण्यात आला तर फ्रान्स ने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी
पुरस्कार देऊन लता मंगेशकर यांचा गौरव केला म्हणून लता मंगेशकरांचे हे स्थान
जगाच्या रसिकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत राहणार आहे यात मुळीच शंका नाही 

“ए मेरे वतन के लोगों जरा आखों में भरलो पानी जो शहीद हुए है उनकी याद करो
कुर्बानी” हे गीत
26 जानेवारी, 15
ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सणामध्ये हे गीत वाजत राहील तेव्हा-तेव्हा या गीतांमधून लता
मंगेशकर यांची प्रखर देशभक्ती आपणाला जाणवल्याशिवाय राहणार नाही त्या म्हणायच्या
संगीत हे परमेश्‍वराची भाषा आहे या स्वर सम्राज्ञीला ईश्वर आपल्या चरणाजवळ नाही तर
हृदयामध्ये जागा देईल यात शंका नाही असे ते म्हणाले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर
सुतार सर यांनी केले. सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली.

Join WhatsApp

Join Now