उमरगा :- संस्कार सैनिक व नवोदय कोचिंग क्लासेस व वस्तीगृह उमरगा येथील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश पूर्व परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे . प्रवेशासाठी एकूण क्लासेसचे अकरा विद्यार्थी पात्र ठरले आहेत
संस्कार क्लासेसने गेली अनेक वर्षाची निकालाची परंपरा कायम राखली आहे दरवर्षी धाराशिव लातूर सोलापूर बीड नांदेड सह महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा क्लासेस कडे ओढ वाढत चालला आहे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ या क्लासेसने निर्माण करून दिले आहे दरवर्षी धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येक नवोदयासाठी 80 विद्यार्थ्यांची निवड होते त्यापैकी तब्बल 11 विद्यार्थी संस्कार क्लासेसचे आहेत यामध्ये
श्याम अमोल जाधव
सार्थक बालाजी पवार
समर्थ सिद्धेश्वर कुंभार
विराज विजयकुमार व्हट्टे
जानवी तुकाराम हावळे
मोहिनी महेश पाटील
समीक्षा अनिल सोनकांबळे
पूर्वी मारुती मोहिते
स्वरूपा संदीप बिरादार
सानवी प्रदीप गिरिबा
विवेक विजय शेळके
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांना क्लासेसचे संचालक महेश सूर्यवंशी सर, शिक्षक पवन गायकवाड सर, सोनकांबळे मॅडम, सूर्यवंशी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा क्लासेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.