सुनीता विल्यम्स यांच्या ऐतिहासिक पुनरागमनाचा उमरग्यात जल्लोष!


नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवसांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर यशस्वीपणे पुनरागमन केले. या अभिमानास्पद क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी उमरगा येथील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सुनीता विल्यम्स यांच्या कर्तृत्वाला नमन केला.

यावेळी नितीन नांगरे, ॲड साईराज टाचले भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, अतुल शिंदे, सुशील लोंढे, अमोल सगर, गणेश कटके, ज्योतिर्लिंग सोनकावडे, संदीप चौगुले शिवसेना युवा सेना नेते, अतुल कुलकर्णी, समर्थ दंडगे, ऋषी सोमवंशी, श्रीधर ढगे, कपिल कुलकर्णी, संगमेश्वर स्वामी, आकाश कर्पे, संतोष वकारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनीता विल्यम्स यांच्या प्रेरणादायी प्रवासावर चर्चा झाली आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या धैर्याचे व समर्पणाचे कौतुक केले. अनेकांनी माध्यमांसमोर बाईट देत या ऐतिहासिक घटनेचा गौरव केला.

उमरगा शहराने देशाच्या एका महान कन्येच्या अभिमानास्पद कामगिरीचा आनंद साजरा करत देशभक्तीची भावना व्यक्त केली.

( संतोष वकारे 8956951915)

Join WhatsApp

Join Now