रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने कै. शरणप्पा मलंग विद्यालय,उमरगा येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आणि इंट्रॅक्ट क्लबची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या उपक्रमासाठी CSR – पी. पी. पटेल अँड कंपनी (मेटल पावडर डिव्हिजन) यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक नियोजित प्रांतपाल (२०२६-२७) रो.जयेशभाई पटेल यांच्या हस्ते झाले,तर या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती होती असे माजी प्रांतपाल डॉ. दीपक पोफळे यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उमरगा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे.सतीश साळुंके हे उपस्थित होते तर सचिव रोटे.जुगलकिशोर खंडेलवाल, माजी अध्यक्ष रोटे.सलाम भाई शेख, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री संजय मलंग रोटरी सदस्य प्रशांत कुलकर्णी विक्रम आळंगेकर धनंजय मेनकुदळे राजू जोशी शिवकुमार दळवी मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा उपप्रांतपाल 3132 रोटे.अजित गोबारे, रोटे.कलशेट्टी पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करत असताना रोटे.जयेश पटेल म्हणाले की, सेवा हा धर्म मानून रोटरी क्लब संपूर्ण जगभरात काम करते आरोग्य शिक्षण समाजसेवा खेळ जलसिंचन अशा अनेक क्षेत्रात रोटरीने नेत्र दीपक कामगिरी केलेली आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून या डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन, तसेच आधुनिक शिक्षण प्रणाली उपलब्ध होणार आहे. ४३ इंची मोठा टीव्ही आणि शिक्षणात्मक सॉफ्टवेअर्स देण्यात आले असून,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल.
तसेच,शाळेत इंट्रॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आलीजेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणिवा आणि सेवाभावी वृत्ती विकसित होईल. लागलीच इंट्रॅक्ट क्लबची अध्यक्ष कु. भाग्यलक्ष्मी आप्पासाहेब हत्ते व सचिव वैष्णवी महेश जाधव या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मलंग विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि उमरगा रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे.परमेश्वर सुतार यांनी करून आभार मानले.
🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🙏