बसवरत्न पुरस्कार सोहळा दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी उमरगा येथे होणार आहे

महाराष्ट्रातील लिंगायत समाजबांधव “बसवण्णांचे कायकवे कैलास” या वचनाचा आदर्श ठेवत आपले आर्थिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदान सातत्याने देत आहेत. समाजाच्या एकोप्याने व प्रगतीशील दृष्टिकोनातून देशाच्या उभारणीत लिंगायत समाजाने नेहमीच मोलाचा वाटा उचलला आहे.


या सोहळ्याच्या प्रसंगी श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरू डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी,श्रीशैलपीठ, आंध्रप्रदेश आणि ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर,सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, पंढरपूर, यांच्या मंगल सानिध्यात आणि आशीर्वादाने हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री बसवराजजी पाटील साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य राहणार आहेत. तसेच मा. श्री ज्ञानराजजी चौगुले साहेब मा. श्री बापुराव पाटील साहेब यांच्या व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
या वर्षीचा दुग्धशर्करा योग म्हणजे बसवरत्न पुरस्कार सोहळा समितीचे उप अध्यक्ष व मार्गदर्शक प्रवीण स्वामी गुरुजी यांची उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आलेत याचा संपूर्ण समाजाला अभिमान आहे म्हणून धाराशिव जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार प्रमुख मान्यवराच्या हस्ते करून गौरवण्यात येणार आहे. तसेच समाजातील जेष्ठ नेते दिलीपजी सोपल साहेब माजी मंत्री तथा आमदार, बार्शी यांचा गौरव सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार जाहीर करणारे समितीचे निरीक्षण व निर्णय पुरस्कार जाहीर करणाऱ्या समितीने विविध पैलूंचा सखोल अभ्यास, योगदानाचे मुल्यमापन आणि समाजाच्या आणि देशाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या 21 व्यक्तींना बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रामचंद्र आलुरे, शिवशंकर माळगे, सागर मुंडे, गुरुनाथ बडुरे, ऍड. धनराज बादुले, मेघराज बरबडे,नितीन होळे,बालाजी कुडुंबले, गोविंद पाटील, उल्हास गुरगूरे, नितीन गाढवे, धनंजय शेटे, शिवशंकर चौधरी आदी मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण निर्णय प्रक्रियेअंती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, यासाठी बसवरत्न फाउंडेशनचे पदाधिकारी श्री.शिवकांत पतगे, सोमनाथ माळगे, करण पाटील, बालाजी पतगे, महेशंकर पाटील, जगदीश वरकले, संदीप लिंबाळे, विपुल माळी, धीरज पतगे, शिवानंद तोरकडी आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले.

सर्व लिंगायत धर्मीय बांधव, भगिनींनी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याला आपली उर्जा द्यावी, असे आवाहन सनी पाटील बसवरत्न पुरस्कार सोहळा अध्यक्ष, उमरगा यांनी केले आहे.
धन्यवाद,

  • पुरस्कारार्थी 2025

मा. श्री दिलीप स्वामी
(जिल्हाधिकारी, छ. संभाजी, नगर)
मा. श्री. प्रशांत औटी
(चिफ इंजिनिअर, सा.बां.विभाग नाशिक)
मा. श्री. शंकरतात्या बोरकर
(उद्योजक, मुंबई परंडा)
मा. श्री अमोल बिराजदार
(स्वीय सहाय्यक, मा ना श्री नितीन गडकरी)
मा. श्री. राजेंद्रआबा मुंडे कळंब
(संचालक, सिद्धेश्वर बैंक लातूर, )
मा. श्री. राहुल कुलकर्णी
(एन.डी. टि व्ही मराठी सह संपादक )
मा. श्री. श्रशैल्यमामा हत्तुरे
(समाजसेवक, सोलापूर)
मा. श्री लक्ष्मीकांत पाटील
(अँडव्होकेट, छ. संभाजीनगर)
मा. डॉ. राजशेखर सोलापुरे
(बसवव्याख्याते)
मा. प्रा. मन्मथ पंचाक्षरी
(कार्यवाह काशी विश्वेवर मंदिर लातूर)
मा. श्री किरण कोरे
(बसव व्याख्याते, लातूर)
मा. श्री. शरणप्पा अल्लोली
(सुप्रसिद्ध मुर्तीकार, मुंबई)
मा. श्री अक्षय डोबळे
(माजी नगरसेवक, धाराशिव)
मा. श्रीमती रूपाली आर. कोरे
(घर्मदाय सह आयुक्त, धाराशिव)
मा. श्री. लहु गोंडगावे
(सी.ए. पुणे)
मा. श्री राजु पाटील
(संपादक, द रिंगण लाई, लातूर)
मा. श्री शिवानंद सोळशे
(उद्योजक, जेवळी )
मा. श्री. पवन स्वामी
(युवा ज्योजक, लातूर)
मा. श्री. बसवराज दळगडे
(अररी. व्हा. प्रेसिडेंट, SW)
मा. श्री. शाम सोनटक्के
(प्रक्तशील शेतकरी, उदगीर)
मा. श्री धनराज धुम्मा
(व्यवसायिक, मुरुम)
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य म्हणुन 🙏निसर्गप्रेमी ग्रुप उमरगा 🙏यांना बसवरत्न विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे

Join WhatsApp

Join Now