कन्या हायस्कूल,उमरगा प्रशालेत विद्यार्थ्यांचा “स्वंयशासन दिन” व “निरोप समारंभ” असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला.

 उमरगा : श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, उमरगा संचलित कु. माधवी चालुक्य कन्या हायस्कूल,उमरगा प्रशालेत आज दि.०७/०२/२०२२ रोजी इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा “स्वंयशासन दिन”  व “निरोप समारंभ” असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला. 

विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा, त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे म्हणून स्वंयशासन दिनाचे व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याची यशस्वी वाटचाल सुखकर व्हावी या शुभेच्छारुपी हेतूने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 

school

कन्या हायस्कूल,उमरगा प्रशालेत विद्यार्थ्यांचा

 “स्वंयशासन दिन”  व “निरोप समारंभ” असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला. 

आजच्या या स्वंयशासन दिनाची  मुख्याध्यापिका म्हणून कु. श्रेया जाधव तर उपमुख्याध्यापिका म्हणून कु.चव्हाण प्रेरणा हिने कार्यभार सांभाळला. इयत्ता १०वी च्या अनेक विद्यार्थिनीनी शालेय जीवनातील अनुभव आणि  शिक्षक बनल्याचा आनंदी अनुभव आणि हे सर्व काही सोडून जात असल्याच्या दुःखद भावना या प्रसंगी मांडल्या.इयत्ता ९वी च्या विद्यार्थिनीनी निरोप समारंभाचे उत्कृष्ट नियोजन , सुञसंचलन, आभारप्रदर्शन केले.तद्नंतर स्वयंशासनदिनात उत्कृष्ट अध्यापन केलेल्या शिक्षकांना प्रशालेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वयंशासनदिनाच्या मुख्याध्यापिका कु.श्रेया जाधव या होत्या.कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका श्रीमती सुनिता पाटील तर प्रमुख पाहुणे श्री यादव सर होते.श्री साळुंके सरांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शनात म्हणाले कि भावी आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी किंवा नेतृत्व करण्याची संधी आजच्या स्वंय शासन दिनाच्या नियोजनातून प्राप्त व्हायला मदत होईल. 

श्री यादव सरांनी  विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहाण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाटील यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, मुलींनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रथम ज्ञान संपादन करून विचारांची उंची गाठणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी आणि उत्तुंग यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जाधव एम. डी., श्री गुंजोटे एस. बी., श्री गायकवाड जे.व्ही., श्रीमती एस.एच.साळुंके, श्रीमती तेली एस. डी. आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री वग्रसेन घोगे यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now