आज उमरगा शहरातील बौद्ध व संविधानप्रेमी बांधवांकडून‌ शहर कडकडीत बंद ठेवून रॅली काढण्यात आली

Hello omerga

रभणी येथील “संविधान प्रतिकृतीची” विटंबना प्रकरणी कोबींग ऑपरेशन करुन भीमसैनिकांची धरपकड करुन जेल मध्ये टाकलेल्या पैकी “सोमनाथ सुर्यवंशी” या भिम सैनिकांचा जेल मध्ये संशयीत रीत्या मृत्यू झाला आहे.

त्या घटनेच्या निषेधार्थ आज उमरगा शहरातील बौद्ध व संविधानप्रेमी बांधवांकडून‌ शहर कडकडीत बंद ठेवून रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

नेमकं काय घडलं ?

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं.

त्यामध्येचे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली , मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणार असून त्या रिपोर्टची सर्वांना प्रतीक्षा आहे.

मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार उमरगा तालुका बंद पाळण्यात येणार आहे.

पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण व्हावे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

परभणीत वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, पोस्टमॉर्टम तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी अशी विनंती आमचे वकील न्यायालयात करतील की. पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण करण्यात यावे. फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केले जावे अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

Source : TV9 Marathi

Join WhatsApp

Join Now