धाराशिव:जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली.
बार्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या पदग्रहण सोहळा येथे (दि.२४) रोजी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व डिजिटल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षल लोहार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जुबेर शेख यांची निवड करण्यात आली.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
देशात व राज्यांमध्ये सर्वात जास्त संख्येने मिडियात काम करणाऱ्या पत्रकारितेतील घटक म्हणजे डिजिटल पत्रकार जगाची चक्रे वेगाने फिरवत असताना व सध्या माहिती व ज्ञानाचा सर्वात मोठा स्रोत असताना देखील डिजिटल मीडिया बाबत देशात किंवा राज्यांमध्ये कोणतेही तरतूद नाही,नियमावली नाही,डिजिटलच्या पत्रकारांना कोणतेही मान्यता,मानधन,योजना नाही किंवा भविष्य बाबत नियोजन नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पत्रकार व पत्रकारिता वाचली पाहिजे या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग धाराशिव जिल्हाध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड केल्याबद्दल नूतन जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांनी मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,डिजिटल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षल लोहार,धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,पत्रकार सलीम पठाण,राम थोरात,वाहेद शेख तसेच महाराष्ट्रातील सर्व नूतन जिल्हाध्यक्ष पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.