दि.27:- आज इयत्ता 10 वी व 12 वी मार्च 2022 मध्ये उच्च गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री देवीदासरावजी जाधव( माडीवाले) हे होते तर प्रमुख पाहुणे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव श्री चंद्रकांतराव भातलोंढे सर , माजी प्राचार्य श्री एस वाय जाधव , श्री काशीनाथराव बिराजदार, सौ अनिता माने , मुख्याध्यापक श्री एन एम माने , उपमुख्याध्यापक श्री बी एस जाधव , पर्यवेक्षिका श्रीम एस एम आहिरे हे होते .
प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित पालक , गुणवंत व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करत असताना सचिव श्री चंद्रकांतराव भातलोंढे सर म्हणाले की गुणवंतांनी ही गुणवत्ता येणाऱ्या काळात टिकवली पाहिजे , ही तर गुणवत्तेची प्रथम पायरी असून अजून अनेक ध्येय गाठण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत , प्रयत्नाने माणूस असाध्य तेही साध्य करू शकतो , अब्राहम लिंकन अनेक वेळा अपयशी होवूनही जिद्दीने वयाच्या 52 व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाले , कोणी निंदो , कोणी वंदो यश मिळवण्यासाठी कधी कधी केलेल्या टिकांकडे दुर्लक्ष करून , बहिरे होऊन कार्य करावे लागते .यश हे अनेक टीकाकारांना उत्तर ठरते .यश हे स्वतःपुरते न ठेवता त्याचा कुटुंब , शाळा व समाजासाठी उपयोग झाला पाहिजे .विद्यालयाच्या यशाच्या किर्तीत दिवसेंदिवस भर पडो अश्या शुभेच्छा ही दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवीदासराव माडीवाले म्हणाले की सध्याच्या युगात विद्यार्थ्यांनी आई-वडील , गुरुजन व सर्वांचा आदर करणे या कडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असून असे होणे येणाऱ्या पिढ्याना हानिकारक आहे . शिक्षणाचा खरा उपयोग उत्तम माणूस बनून समाजहिताचे आदर्श जीवन जगण्यासाठी व्हावा .
प्रसंगी इयत्ता 10 वी मार्च 2022 मध्ये उच्च गुणवत्ता संपादन केलेले , सर्वप्रथम आलेला
आदिनाथ एकनाथ माने(96%),
वैष्णवी संदीप कांबळे(94.20%),
श्रध्दा तानाजी पवार(93.60%),
स्नेहा वैजनाथ माने(93.40%),
अनुष्का आनंद थोरे(93.20%),
श्रेया विष्णू पवार(93.20%),
गोपाळ गणपत जमादार(91.60%),
विजय ज्ञानेश्वर पवार(91.40%)
दीक्षा नेताजी बिराजदार(91.20%),
अजय शिवानंद सालेगावे(91.20%),
श्वेता हरी भोसले(90.80%),
राजश्री दिलीप कांबळे(90.40%),
वैष्णवी पांडुरंग जाधव(90.40%),
कैफ ताजोद्दीन मुरमे(90.20%),
अविनाश संतराम सूर्यवंशी(90.20%),
ऋतुजा राजाराम बिराजदार(90.20%)
12 वी मार्च 2022 मधील विज्ञान शाखेतील
प्रथम श्रीनिवास वेदपाठक(71.83%),
द्वितीय प्रतीक्षा तांबोलकर(71.00%) व
कला शाखेतून
प्रथम सादीया मुजावर(76.00%),
द्वितीय प्रतीक्षा बिराजदार(73.50%)
यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी पालक प्रतिनिधी श्री काशीनाथराव बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले .त्यानंतर इंग्रजी विषय शिक्षक डॉ गजेंद्र मुगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इंग्रजी विषयाच्या क्रिएटिव्ह माइन्ड्स’ या भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तम मार्गदर्शन करून उच्च गुणवत्तेपर्यंत पोहोंचवल्याबद्दल श्री वेदपाठक या पालकांनी मुख्याध्यापक यांचा सत्कार केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री बी एस जाधव यांनी , सूत्रसंचलन श्री गजेंद्र मुगळे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीम एस एम आहिरे यांनी केले .कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.








