धाराशिव नंतर सोलापूर जिल्ह्यात झाला राज्यस्तरीय सन्मान
सोलापूर जिल्ह्यातील ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेकडून दिनांक 19 ऑकटोबर रोजी माऊली लॉन्स बार्शी येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला,यामध्ये निवासी मूकबधिर शाळा उमरगा येथे कार्यरत विशेष शिक्षक भगवान वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती केंद्र बार्शीचे डॉ. संदीप तांबारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडिया प्रदेश अध्यक्ष अजित कुंकूलोळ, अनिल बनसोडे,पुण्याचे स्त्रीरोग तज्ञ डॉ विपुल खंडागळे,उमेश लुकडे,डॉ. आदित्य साखरे, हृदयरोग तज्ञ डॉ.जगताप,अमृत नाना राऊत , विजयकुमार दिवाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा ,ट्रॉफी ,प्रशस्त पत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले सदर पुरस्कार भगवान वाघमारे यांनी सपत्नीक पूर्ण कुटुंबासमवेत स्वीकारताना दिसून आले.
मुकबधिर विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य करणारे शिक्षक भगवान वाघमारे यांना दि 29 सप्टेंबर रोजी बालाजी गायकवाड यांच्यावतीने आयोजित बहुजन रयत परिषद महाराष्ट राज्य साहित्यरत्न लोक शाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमीत्य, उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करनाऱ्या व्यक्तींचा सन्मान माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला होता त्यात निवासी मुकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक भगवान वाघमारे यांना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला होता.एकाच महिन्यात दुसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्तीमुळे भगवान वाघमारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.