कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

दि. 1 ऑगस्ट 2022 वार सोमवार आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्ताने शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ही जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरणप्पा मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर व प्रमुख पाहुणे म्हणून कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री कविराज रेड्डी सर हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख श्री अगतराव मुळे सर हे लाभले होते.

malang

कै.शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

    सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यसम्राट शरणप्पा मलंग अप्पा यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी सामूहिक भारत मातेची आरती गायली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना मराठी विभाग प्रमुख श्री अगतराव मुळे सर म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिकच नाही तर दिन दलित पद दलितांचे अश्रू पुसत ते प्रत्यक्ष जीवन जगले आणि म्हणून ते लोकशाहीर या पदवीस खऱ्या अर्थाने समर्पित झाले. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये मातंग समाजामध्ये दारिद्र्यामध्ये किचपत पडलेल्या कुटुंबामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला दीड दिवसाच्या शाळेमध्ये गेलेले अण्णाभाऊ साठे यांना साधे अक्षरांची ओळख नसतानाही साहित्यात त्यांनी खूप मोठे योगदान देतील असे त्यावेळी कोणालाही वाटले नाही गावातील करतेपुरुष आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली ते मुंबई प्रवास करत होते आणि त्या लहान वयात ही अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्यासोबत मजल दरमजल करीत पायी मुंबई गाठली आणि तेव्हा कुठे त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटला एकीकडे गुराढोरा सारखी मेहनत करीत असताना त्यांच्या मधला साहित्यिक त्यांना हे कष्टाचे जीवन जगू देत नव्हता म्हणून त्यांनी दुकानावरील मराठी पाट्यांची नावे वाचून अक्षर जुळवणूक केली व समाजाच्या शाळेमध्ये साहित्यिक अनुभवाचे धडे घेऊ लागले आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले दुःख दारिद्र्य कष्ट वंचितांचे जीवन याचेच प्रतिबिंब त्यांनी स्वतःच्या साहित्यामध्ये उमटले शिकण्याची इच्छा असेल तर माणूस कसाही शिकतो केवळ शिकतच नाही तर उच्च प्रतिभेचा साहित्यिक ही होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले. कामगार चळवळीमध्ये काम करीत असताना त्यांनी जगाला ओरडून सांगितले पृथ्वीही शेशाच्या डोक्यावर स्थिर झाली नसून रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कामगारांच्या हातावर स्थिर झाली आहे असे ते म्हणाले. फकीरा या कादंबरी पासून पाटेगावचा बापू वारणेचा वाघ अशा एक नाही तर अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांनी मिळवले ,संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी प्रत्येक गावामध्ये शाहीरीचे कार्यक्रम घेऊन “जग बदल घालुनी घाव, गेले सांगूनी मला भीमराव” या पोवाड्याने सर्वसामान्यांच्या मनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा केला. शाहीर विठ्ठल उमाप यांनी त्यांच्या भेटीतील त्यांच्या जगण्याची कहाणी विशद केली ती डोळ्यात पाणी आणणारी आहे असे ते म्हणाले.

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तर या वक्तृत्व स्पर्धेचा विषय ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान” यामध्ये कु. साक्षी शंकर सूर्यवंशी इयत्ता आठवी सेमी हिने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक चि. रमणराज चंद्रकांत खराडे इयत्ता आठवी सेमी या विद्यार्थ्यांनी मिळविला तृतीय क्रमांक कु. प्रीती विजयकुमार घोडके इयत्ता नववी सेमी व कु. साक्षी सतीश पाटील इयत्ता नववी सेमी तर उत्तेजनार्थ चि. गणेश जयपाल शिंदे आठवी मराठी व कु. ऋतिका गोविंद स्वामी इयत्ता आठवी सेमी या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी केले तर आभार श्री परमेश्वर कोळी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री राजकुमार जाधव सर, श्री सतीश कटके सर, श्री विवेकानंद पाचंगे सर, श्री बालाजी हिप्परगे सर, श्रीमती प्रभावती बिराजदार मॅडम, श्रीमती मीनाक्षी हत्ते मॅडम श्री कलशेट्टी पाटील श्री दुष्यंत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now