येथील साप्ताहिक विश्वविनायकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विशेष नामवंत, गुणवंत, कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात अनाथाची माय, गोर-गरीब दलित उपेक्षितांच्या आधारस्तंभ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयाताई वाघ यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उभ्या आयुष्यातील 30 वर्षे समर्पित केलेली आहेत. नैसर्गिक आपत्ती यात भूकंप,दुष्काळ, कोविड19,सोबत अनाथ मुलांचं घर चालवणे.महिला संघटन,कुटुंब सत्ते पासून राज्यसत्तापर्यंत महिलांनी जाण्यासाठी,लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बचत गट स्थापन करणे, बँक लिंकेच करणे. आणि महिला अत्याचार विरोधी महाभियान तयार करून महिला हिंसमुक्त करण्यासाठी महान कार्य केला आहे. समान प्रॉपर्टी साठी महिलांची भागीदारी वाढविणे,घर पती-पत्नीच्या नावे होण्यासाठी कायदा पारित करायला सरकारला भाग पाडने,मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहाचा जीआर पारित करायला शासनास भाग पाडणे. हजारो महिलांचे प्रेरणास्थान म्हणून समाज विकास संस्थेच्या आणि महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बदलाचे कार्य केले आहे.म्हणून
आज दी 25.8.2024 रोजी श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टर च्या वतीने कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित आले. याप्रसंगी डाव्या बाजूला किरण गायकवाड समोर निखिल वाघ,विद्याताई वाघ,आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथन (आणा)तोडकर उजव्या बाजूला भूमिपुत्र वाघ,धनंजय रणदिवे, प्रोफेसर श्रीकांत गायकवाड, कैलास शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज,शाल श्रीफळ ट्रॉफी आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले…