उमरगा दिनांक 17 ऑगस्ट 2024 वार शनिवार रोजी शरणप्पा मलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंद्रधनुष्यातील आजी आजोबांशी हितगुज करत मुलाखत घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुरशिद्धप्पा कारले तर प्रमुख अतिथी म्हणून श्री तुकाराम नवले सौ सुमन कारले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री अजित गोबारे सर म्हणाले आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ आपले आजी-आजोबा असतात त्यांची आपण सर्वजण काळजी घेतो पण काहीतरी अडचणीच्या निमित्ताने आपले घर सोडून वृद्धाश्रमात राहण्यासाठी येतात हे सुद्धा आपलेच आजी-आजोबा आहेत आपण सर्वांना मायेने प्रेमाने हितगुज केले तर सुखदुःखाचा आनंद सोहळा साजरा करता येतो म्हणून आम्ही सहशालेय उपक्रमांतर्गत रक्षाबंधन व वनभोजन करण्यासाठी येथे आलो आहोत.
“श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे ।”
शासनाचा दर शनिवारचा दप्तराविना शाळा अतिशय आनंदाने साजरे करण्यासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी वनभोजन करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
यावेळी कुरशिद्धप्पा कारले व तुळशीराम नवले यांची मुलाखत कु. विधी अजित गोबारे हिने घेतली ते म्हणाले माणसाचे जीवन संघर्षाने भरले आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते इच्छा नसताना वृद्ध आश्रमात राहावे लागते आयुष्यात कुठेतरी तोडजोड करावी लागते म्हणून हा मार्ग निवडावा लागतो मुलांनी आपल्या आई-वडिलाप्रमाणे सासू-सासर्यांची काळजी घ्यावी त्यांना प्रेम करावे असे ते म्हणाले.
वनभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परमेश्वर सुतार सर यांनी करून आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शरणप्पा मलंग विद्यालयातील सहशिक्षक श्री राजकुमार जाधव, श्री अगतराव मुळे, श्री सतीश कटके, श्री विवेकानंद पाचंगे, श्री बालाजी हिप्परगे, श्री परमेश्वर कोळी, श्री सचिन हुडेकर, श्री सचिन सूर्यवंशी, श्रीमती प्रभावती बिराजदार, श्रीमती सोनी ढवळे, श्रीमती गुरसाबाई स्वामी व शिक्षकेतर कर्मचारी श्री दुषंत कांबळे, विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित होते









