राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आनंदोत्सव साजरा

आमदार ज्ञानराज चौगुले , माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी ट्रस्टचे केले कौतुक

उमरगा प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुस्लिम युवकांनी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना फळे, बिस्कीट, पाणी वाटप करून साजरा करण्यात आला.


नेहमी समाज कार्यात सहभागी होणाऱ्या शहरातील मुस्लिम युवकांनी मिळून राहत चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. स्वातंत्र्य दिनी शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी आपल्या आपल्या शाळेचा झेंडा वंदन करून उपविभागीय कार्यालयात झेंडा वंदन साठी येतात. या सर्व शालेय विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता १५), नगर परिषद समोर राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बिस्कीट, पाणी वाटप करून आनंदोत्सव करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमात तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले , माजी खासदार रविंद्र गायकवाड , जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती अभय चालुक्य , माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे , शिंदे सेनेचे तालुका प्रमुख बळीराम सुरवसे , ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे आदींनी सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला, वसीम लदाफ, रियाज शेख,खलील शेख, नसीर खान, वहाब अत्तार, अमजद मानियार,इसाक शेख, वसीम चौधरी, सर्फराज बागवान, मुजीब इनामदार, शौकत औटी, जमीर जमादार, हाफिज समीर,शकील शेख, अल्लाओदीन शेख, आमजद मौलाना, इम्रान मणियार, मौला शेख, इमाम मुजावर,अजीम लदाफ, अकील जमादार, महेबूब मुल्ला, मुस्तफा लदाफ, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now