उमरगा पोलीस स्टेशन पहिल्या महिला नूतन दबंग पोलीस मा. अश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल बहुजन रयत परिषद संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बहुजन रयत परिषद संघटनेच्या वतीने दि.8/8/2024 रोजी उमरगा पोलीस स्टेशन येथे पहिल्या महिला नूतन दबंग पोलीस निरीक्षक म्हणून मा. अश्विनी भोसले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल व पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांना राज्यघटना देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला व तसेच बहुजन रयत परिषद उमरगा तालुका सचिव पदी श्री संभाजी काळे यांची निवड करण्यात आली या यावेळी उपस्थिती बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री.ईश्वर क्षीरसागर व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.बालाजी गायकवाड सौ.सरोजाताई ईश्वर क्षीरसागर बहुजन रयत परिषदेचे उमरगा लोहारा महिला तालुकाध्यक्ष सौ.मीनाक्षी गायकवाड बहुजन रयत परिषदेचे उमरगा महिला शहराध्यक्ष सौ.लक्ष्मी ताई वाघमारे,मीराताई वाडेकर,कविता कांबळे,ज्ञानेश्वर वाघमारे,सोपान गायकवाड यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होती

Join WhatsApp

Join Now