ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लोहारा लि.धाराशिव (उस्मानाबाद) च्या पहिल्या शाखेचा उदघाटन सोहळा

ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि.धाराशिव (उस्मानाबाद) च्या पहिल्या शाखेचा उदघाटन सोहळा लोहारा शहरातील जगताप कॉम्पलेक्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी सुनील शिरापूरकर, जि. उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद, मधुकर जाधव जिल्हा सहकार विकास अधिकारी उस्मानाबाद, मोहयोद्दीन सुलतान, मुख्य प्रशासक कृ.उ.बा.समिती उमरगा, तहसीलदार संतोष रुईकर, ज्ञानज्योती पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक ऍड.आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, यांची प्रमुख उपस्थिती होती.  

याच कार्यक्रमादरम्यान ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण ही संपन्न झाले. प्रथम क्रमांक सुजाता नागनाथ जोगी – 7555 रु. व चषक, द्वितीय क्रमांक दयानंद मोहन स्वामी – 5555 रु. व चषक, तृतीय क्रमांक करणं थोरात – 4555 रु., उत्तेजनार्थ – वर्षाताई माधव मोघे 3555 रु. यांसह 6 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पैठणी साडी पारितोषिक म्हणून देण्यात आली. तसेच लोहारा तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 

यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे,  शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, ज्ञानज्योती संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार वडदरे, सचिव प्रदीप मदने, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, बी.व्ही.काळे, सहायक निबंधक, ज्योतीताई चौगुले, उपाध्यक्ष आयुब शेख, अशोक सांगवे, प्रताप लोभे, नगरसेवक अविनाश माळी, अमीन सुंबेकर, सारिकाताई बंगले, मयुरीताई बिराजदार, सुमनताई रोडगे, शामलताई माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, संचालिका मीराताई फुलसुंदर, मुक्ताबाई भोजने, संदीप चौगुले, खयूम चाकूरे, अरुण जगताप, प्रमोद बंगले, बब्रुवान पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, आदी उपस्थित होते. 

Join WhatsApp

Join Now