आदर्श
गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा आदर्श सरपंच अमर सुर्यवंशी
सध्याचे युग इंटरनेटचे युग आहे. सध्या सोशल मिडीयावर जगातील कुठे ही
घडलेली घटना एका क्षणात आपल्याला समजते. सोशल मिडीयावर आदर्श गाव, आदर्श
सरपंच अशा अनेक घटना आपण बघत असतो. परंतू उमरगा तालुक्यातील एका ध्येय वेड्या
तरुणांनी सोशल मिडीयावर आदर्श गावाची संकल्पना आपल्या स्वतःच्या गावात सत्यात
उतरविल्या आहेत. गावाचा विकास करणारा व विकासाबरोबर गावातील तरुणांचा व
पर्यावरणाचा विकास कसा करता येईल हे स्वप्न पाहून सत्यामध्ये उतरविण्याचा आटोकाट
प्रयत्न केला आहे. या संकल्पना राबविणाऱ्या अशाच एका तरुणांच्या कार्यावर आज आपण प्रकाश
टाकणार आहोत. उमरगा तालुक्यातील जकेकरवाडी या छोट्याशा गावात शेतकरी कुटूंबात
जन्मलेल्या अमर भगवान सूर्यवंशी या सुशिक्षित युवकाने अल्पावधीतच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच उद्योग व्यवसायात केलेली
प्रगती थक्क करणारी आहे.
शालेय जीवनापासूनच नावलौकिक मिळविणारे अमर सूर्यवंशी
गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या अमर सूर्यवंशी यांनी १० वी
नंतरचे शिक्षण महात्मा बसवेश्वर विद्यालय लातूर येथे पुर्ण केले. पदवीचे शिक्षण
उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पुर्ण केले. लहानपणा पासून हुशार
असलेल्या अमरने वक्तृत्व स्पर्धेत आपला आवाज मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक
भागात घुमवला. आता पर्यंत अनेक राज्यस्तरीय पारितोषिक मिळवीत मराठवाड्याचा युवा
वक्ता स्पर्धेत दोन वेळेस अंतिम स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाकडून 2016-17 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विध्यार्थी म्हणून
पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाविद्यालयातर्फे विद्यापीठात युवक महोत्सव चे सलग
तीन वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत महाविद्यालयाला
पारितोषिक मिळवून देण्यात सिहाचा वाटा उचलला.
जन्मजातच शेती विषयी प्रेम
अमरचा जन्म शेतकरी कुटूंबात झाल्याने शेतीविषयक प्रेम हे जन्मजातच
मिळाले. शेतीला जोडधंदा केला पाहीजे म्हणुन अमरने व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण
करण्याचे ठरवले. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने उद्योग करण्यासाठी पुरेसे पैसे
नसल्याने आईचे व बहिणीकडील दागिने तारण ठेवून पेट्रोल पंप चालु केला. पेट्रोल पंप
व्यवसायात जम बसवून त्याला आणखी जोड म्हणून वॉटर प्लांट, उमरगा
शहरात कॅफे, रेस्टॉरंट चालु केले. आज त्याच्याकडे जवळपास 80
ते 90 कामगार काम करतात. त्याच बरोबर
कामगारांना उदरनिर्वाह साधन उपलब्ध करून दिले आहे. सर्व व्यवसाय सांभाळत सामाजिक
क्षेत्रात काम करण्याची ओढ मात्र काही कमी होत नव्हती. गावातील युवकांना एकत्र
करीत शिवगर्जना प्रतिष्ठान ची स्थापना केली. गावात शिवजयंती निमित्त वेगवेगळे
उपक्रम राबवले. उपक्रम राबवत असताना वृक्षारोपणवर जास्त भर दिला, तसेच ग्रामस्वच्छता विषयी गावातील तरुणासोबत गावातील नागरीकांचा सहभाग
वाढवला. गावातील जनता आता अमरकडे आशेने पाहू लागली. हा तरुण जर गावचा सरपंच झाला
तर गावचा विकास करु शकतो हे जनतेच्या मनात होते. गावातील तरुणासह ज्येष्ठ मंडळीनी
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विनंती केली. परंतु आपल्याला राजकारणात यायचे नाही
म्हणून नकार दिला. गावातील लोकांचा ओढा मात्र कमी होत नव्हता. गावातील हजारो
लोकांच्या आग्रहास्तव शेवटी नाविलाजाने राजकारणात यावे लागले. गावाने बिनविरोध
सरपंचपदी बसवले. गावात एकही रस्ता नीट नव्हता, गटारीचे पाणी
रोडवरून वाहत होते, दारू विक्री गुटखा मोठ्या प्रमाणात विकला
तर जात होता. युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात होती. गावची मोठ्या प्रमाणात
दुरवस्था झाली होती.
सरपंच :
अमर भगवान सूर्यवंशी
उपसरपंच :
सुनीता राजेंद्र जगताप
ग्रामपंचायत सदस्य :-
पमलबाई व्यंकट औरदे
महादेवी ओमशिवा मुळे
अर्चना जितेंद्र सुर्यवंशी
मधुकर रामचंद्र सुर्यवंशी
खंडेराव वामन दूधभाते
विष्णु माणिक गायकवाड
ग्रामसेवक : गणेश माळी
सेवक : परमेश्वर धनुरे, गुंडाप्पा रेड्डी
ग्रामपंचायत कार्यलय, जकेकुरवाडी
ता. उमरगा, जि. उस्मानाबाद








