आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून गुंजोटी ता.उमरगा येथे मंजुर झालेल्या सुमारे 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन / लोकार्पण शनिवार दि.15 रोजी मा.खा.प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
गुंजोटी येथील 4 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण / भूमीपूजन संपन्न.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना नेते जितेंद्र शिंदे, मा. बांधकाम सभापती अभय चालुक्य, युवा नेते किरण गायकवाड, मा. सभापती मोहयोद्दिन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, उपसरपंच आयुब मुजावर, चेअरमन सहदेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सरस्वती कारे या होत्या.
महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा व त्यांच्या समस्यांची जाण असणारा दिलदार मनाचा मुख्यमंत्री लाभल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भरघोस असा निधी प्राप्त होऊन सर्वत्र विकासकामांचा वेग वाढलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते कार्यक्षम असून यांना तळागाळातील विविध स्तरावरील लोकांचे प्रश्न माहीत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढील काळात नक्कीच प्रगती करेल असा विश्वास यावेळी बोलताना प्रा.रविंद्र गायकवाड सर यांनी व्यक्त केला.
गुंजोटी गावाजवळील पुल बांधकाम करणे – 314.73 लक्ष रू, हनुमान मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे – 15 लक्ष रू., हजरत सरनशहावली तकिया कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधणे – 10 लक्ष रू., गुंजोटी ते कदेर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 55 लक्ष रू. आदी विकासकामांचे यावेळी लोकार्पण व भूमिपूजन यावेळी संपन्न झाले.
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, माजी सरपंच शंकरराव पाटील, विभागप्रमुख प्रदीप शिवणेचारी, सतीश जाधव सरपंच कदेर, बसवराज टोम्पे, शिवसेना शाखाप्रमुख योगेश शिंदे, योगेश तपसाळे, संदीप चौगुले, ठेकेदार अलीम विजापूरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पिंटू साखरे, बाबुराव कलशेट्टी, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.प. बांधकाम विभागातील शाखा अभियंता, गुंजोटी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शिवसैनिक, तसेच पंचक्रोशितील औराद, कदेर, कसगी, कंटेकुर, भुसणी, गुंजोटीवाडी आदी गावचे सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









