उमरगा शहरातील श्री क्षेत्र रेणुका देवी गोंधळीवाडा च्या पालकीचा छबिना पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात काढण्यात आला

         उमरगा शहरातील श्री क्षेत्र रेणुका देवी गोंधळीवाडा च्या पालकीचा छबिना पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात काढण्यात आला. 
              उमरगा शहरातील श्री क्षेत्र रेणुकादेवी मंदिर गोंधळीवाडा च्या पालखीची मिरवणूक सोमवार दि. ०७ रोजी पहाटे ५.०० वाजता सवाद्य काढण्यात आली.प्रथमतः पहाटे ५.०० वाजता रेणुकादेवी मंदिराचे अध्यक्ष अरुण इगवे यांच्या हस्ते श्रीची महाआरती करण्यात आली व मंदिरातील घट हलविण्यात आले .
                    रेणुकादेवी मंदिरापासून पारंपरिक वाध्य संबळ, तुणतुणे, धनगरी ढोल, हलगी, तुतारी, बँडबाजा, ढोल ताशा आदींच्या संगीतमय वातावरणात  काढण्यात आली.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पालखीच्या पुढे  आराध्यांचा मेळा पोत घेऊन नाचत होता तर पाठीमागून डोक्यावर कलश व हातामध्ये आरतीचे ताट घेऊन येण्याने पालखी सोहळा दिमाखदार दिसत होता.
                 यावेळी महिला, पुरुष, वृद्ध, बालक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now