भारत विद्यालय उमरगा प्रशालेत "वॉटर बेल' उपक्रमाला सुरवात

  भारत विद्यालय उमरगा  प्रशालेत  सोमवार (ता. 13.01.2020
वॉटर बेलउपक्रमाला सुरवात



मानवी आरोग्यासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे; पण पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार जडतात. लहान मुले तर दिवस-दिवसभर पाणी पिण्याचे टाळतात. हेच हेरून  भारत विद्यालय उमरगा  प्रशालेत  सोमवार (ता. 13.01.2020) “वॉटर बेलउपक्रमाला सुरवात झाली आहे.
जगण्यासाठी पाणी आवश्‍यकच अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो; पण पाण्याचा एकही थेंब न घेता पाच दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण एक टक्का कमी झाले तर आपल्याला तहान लागते. हे प्रमाण पाच टक्‍क्‍यांनी कमी झाले तर स्नायूंची शक्ती तसेच जोम कमी होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण दहा टक्के कमी झाल्यानंतर माणसाला भ्रम व्हायला सुरवात होते. दृष्टी अंधुक होते. वीस टक्के पाण्याचे प्रमाण कमी झाले तर मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे अतिशय आवश्‍यक आहे.जर पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले तर शरीरातील टाकाऊ पदार्थ साचून त्वचा कोरडी होणे, अपचन, बद्धकोष्ठता, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतात. नाजूक अवयवांचे रक्षण डोळे, तोंड, पचनसंस्था, सांधे इत्यादी अवयवांना पाण्याचा पुरेसा पुरवठा आवश्‍यक असतो; पण याकडे आपले कधीच पुरेसे लक्ष नसते. पाण्याच्या अभावामुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम
केरळमधील शाळांच्या धरतीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे या दृष्टीकोणातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी दिवसांतून भोजन वेळेच्या अगोदर आणि नंतर शिवाय मधल्या सुटीत मुलांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण दिली जाते. घंटा वाजताच मुले एकाच वेळी दप्तरातून पाण्याची बॉटल काढून पाणी पितात. हा उपक्रम  प्रशालेचे मुख्याध्यापक शाहुराज जाधव यांच्या मार्गदर्शनाने  शाळेत सुरू केला. या उपक्रमाचे पर्यवेक्षक विक्रांत मोरे,संजय देशमुख , सर्व शिक्षक,पालक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.

Join WhatsApp

Join Now