दिनांक: 30/10/2023.
विषय: फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे मनाई आदेश.
आदेश
ज्याअर्थी, धाराशिव जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध भागात धरणे आंदोलने, रस्ता रोको, उपोषण, इ. चालू आहेत. तसेच उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस जाळण्यात आलेली आहे. तसेच उद्या दिनांक 31.10.2023 रोजी मी. इंदापूर ता. वाशी, येडशी ता. धाराशिव तसेच तुळजापूर येथे ठिकठिकाणी रस्तारोको, बैलगाडी मोर्चा रेलरोको करण्यात येणार आहे. बीड जिल्हयामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांच्या पडसादामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्याअर्थी धाराशिव जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमतेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णया प्रत मी आलो आहे.
त्याअर्थी, वेळेअभावी सर्व संबंधीत यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने मी सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धाराशिव मला प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी धाराशिव जिल्हा हद्दीपर्यंत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे.
सदरील संचारबंदी आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत
सदरील आदेशामधून खालील बाबींना सूट राहील..
1. शासकीय / निमशासकीय कार्यालये
2. दूध वितरण.
3. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना,
4. सर्व बँका.
5. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना
6. रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था,
07. दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, रुग्णवाहिका
08. विदयुत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने
09. प्रसार माध्यमे, मिडीया.
10. अत्यावश्यक सेवा देणा-या आय. टी. आस्थापना.
11. अत्यविधी अंत्ययात्रा.
सदरचा आदेश दिनांक ३०.१०.२०१३ रोजी माझ्या सही शिक्यानिशी दिला.
सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.






