शाळेच्या ऑफिस चे दरवाजा(कडी,कोंडा) तोडून 52350 रुपयाचा माल लंपास….
उमरगा प्रतिनिधी अमोल गायकवाड
उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली येथील समृद्धी इंग्लिश स्कूल येथे दिनांक 27 वार सोमवार रोजी शाळेचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील संगणक, प्रिंटर, वायर, साऊंड सिस्टीम, आदीसह इतर साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती.
समृद्धी इंग्लिश स्कूल येथे भुयार चिंचोली शाळेच्या इमारतीचे समोरील दार तोडून अज्ञात चोरट्यांनी आतील शाळेचे उपयोगी 52350 हजाराचे साहित्य चोरून आहे
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे रावसाहेब श्रीमंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिवाळी सुट्ट्या नंतर 28 नोव्हेंबर, मंगळवार रोजी शाळेचे द्वीतिय सत्र सुरू होत असल्याने शाळेचे कर्मचारी यांनी 27 नोव्हेंबर रोजी शाळा साफ सफाई करून संध्याकाळी 6 वाजता बंद करून गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा उगडणे साठी शाळेचे कर्मचारी गेले असता शाळेचे दार खुले दिसले याबाबत कर्मचारी यांनी मुख्याध्ापकांना फोन करून कळवले असता त्यांनी तातडीची धाव घेतली व शाळेचे सचिव यांना कल्पना दिली…
सर्वजण पाहता शाळेला लागणारे 52350 रुयाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.या प्रकरणी मुरूम पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात मुख्याध्यापक बनसोडे रावसाहेब श्रीमंत यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आहे.
पुढील तपास मुरूम पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव काशिराम राठोड हे करीत आहेत…..








