उद्योगपती श्री.मोरे यांनीही केली रु. 51 हजाराची मदत ; आ.ज्ञानराज चौगुले यांचा पुढाकार
उमरगा:- सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आर्थिक अडचणीत असल्याने अनेक सेवाभावी संस्था व नागरिक यांच्याद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड -19 साठी अर्थसहाय्य करत आहेत.
लोहारा-उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती सामाजिक संस्थेद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत 51,000 /- रुपयांचे अर्थसहाय करण्यात आले. तसेच आ.चौगुले यांनी इतर नागरिक व सेवाभावी संस्थांनाही मदतीचे आवाहन केले होते.
यानुसार उमरगा येथील जेष्ठ नागरिक तथा उद्योगपती श्री.एल.टी. मोरे यांनी 51,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तसेच उमरगा येथील जेष्ठ नागरिक तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉ.काशीनाथ चिंचोळी यांनीही त्यांचा नातू ईशान अनुप चिंचोळी याच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड – 19 साठी 31,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. याबद्दल लोहारा-उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी श्री.मोरे व डॉ.चिंचोळी यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनीही उभयंतांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.