मुंबई – पुणे सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढण्याची शक्यता – उपविभागीय अधिकारी श्री.विठ्ठल उदम



सध्या मुंबई – पुणे सह इतर जिल्ह्यातून व परराज्यातून हजारो नागरिक दररोज उमरगा व लोहारा तालुक्यात येत असून यामुळे कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी श्री.विठ्ठल उदमले यांच्या उपस्थितीत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

helloomerga
मुंबई – पुणे सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढण्याची शक्यता
उपविभागीय अधिकारी श्री.विठ्ठल उदम

यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यात परराज्यातुन व परजिल्ह्यातुन येणाऱ्या प्रत्तेक लोकांना शासनाच्या सूचनेनुसार संस्थात्मक व घरगुती विलगीकरण करून त्यांची रीतसर नोंद ठेवावी व या प्रत्येक लोकांकडे 14 दिवसाच्या कार्यकाळात किमान 1 दिवसाआड आरोग्य, महसूल, नगरपालिकेचा कर्मचारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा कर्मचारी भेटून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करावी व त्याची नोंद ठेवून दररोज वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा. अशा सूचना प्रशासनास दिल्या.
यावेळी विलगीरण कक्षासाठी प्रशासनाद्वारे शासकीय शाळेसह, सर्व खाजगी शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये हे सर्व आवश्यकतेनुसार राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल उदमले यांनी दिली. तालुक्याच्या सर्व सीमांवर चोख बंदोबस्त ठेवणे, अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित ठेवणे, शहरी व ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण करून घेणे यासह अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सर्व गरजूंपर्यंत पोहचवणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक, उमरगा, शेजाळ, पोलीस निरीक्षक, मुरूम, तालुका आरोग्य अधिकारी, राजेंद्र साळुंके, गटविकास अधिकारी, उमरगा, नायब तहसिलदार विलास तरंगे, रोहन काळे, डॉ.पंडित पुरी वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, उमरगा, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तसेच उमरगा व मुरूम नगरपालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now