कर्जमाफी व नवीन कर्ज वाटपबाबत तालुक्यातील बँक व्यवस्थापक, गटसचिव, शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न.

कर्जमाफी सद्यस्थिती व नवीन कर्ज वाटप उमरगा लोहारा तालुक्यातील बँक व्यवस्थापक, गटसचिव, शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न. 
मागील काही दिवसांत उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका घेतल्या होत्या. 
या बैठकांमध्ये शेतकऱ्यांनी प्रामुख्याने पीककर्ज मिळण्यास होत असलेल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने मी दि.17 जून 2020 रोजी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व बँकांचे गटसचिव, बँक व्यवस्थापक, व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. 
यावेळी बोलताना शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जाचक अटी न लावता कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून द्यावे,  कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून शेतकऱ्यांना कर्ज वितरण करावे, 
गट समन्वयक, बँक प्रशासन, व शेतकरी यांच्यात योग्य समन्वय ठेवावा, स्टॅम्प पेपरसाठी शेतकऱ्यांना बाहेर पायपीट करायला न लावता स्टॅम्प पेपरची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावी, बँकेकडून पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यासाठी फेरफार नक्कलची मागणी करू नये, सामाईक क्षेत्रासाठी सर्व खातेदारांचे खाते काढून सह कर्जदार म्हणून कर्ज वितरित करावे, शेतकऱ्यांकडून इतर बँकांचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याऐवजी स्टॅम्प पेपरवरती हमी पत्र घेण्यात यावे, ऊस पिकावरील कर्जासाठी कारखान्याचे हमीपत्र मागणी करू नये त्याऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे, मुद्रा योजनेतूनही छोट्या उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज वितरित करावे अशा सूचना केल्या. 
खासदार ओमराजे निंबाळकर यांना सदर बैठकीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही या बैठकीस आवर्जून उपस्थिती लावली व शेतकरी प्रतिनिधींच्या समस्या ऐकून घेतल्या. व सर्व व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये अशा सूचना केल्या. 

Join WhatsApp

Join Now